Coronavirus in Maharashtra | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची भीतीदायक आकडेवारी, सर्वाधिक रुग्ण ‘या’ ठिकाणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 8 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने (Coronavirus in Maharashtra) वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकारनेही (State Government) कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या वेगात मंकीपॉक्सनेही (Monkeypox) टेन्शन वाढवलं आहे.

 

देशात कोरोना संसर्गाचे 4270 नवे रुग्ण आढळून आले असताना एकट्या महाराष्ट्रात 1357 नवीन रुग्ण आढळून (Coronavirus in Maharashtra) आले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 1134 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि तिघांचा मृत्यू झाला होता. राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा (Active Patient) आकडा 5 हजार 888 वर पोहचला आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

मास्क वापरण्याचे आवाहन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी सभागृहात, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क (Mask) वापरावे. मास्कच्या वापरावर सरकार कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 78 लाख 91 हजार 703 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 865 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत

कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 4 जून रोजी मुंबईत 889 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर शुक्रवारी (दि.3) 763 नवीन रुग्ण आढळले होते. मुंबईमध्ये कोरोनाचे 4,294 सक्रिय रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 10 लाख 68 हजार 897 रुग्ण आढळले आहेत.

 

मंकीपॉक्सने वाढवलं टेन्शन

कोरोना महामारीच्या काळात मंकीपॉक्सनेही टेन्शन वाढवलं आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) पाच वर्षाच्या मुलीमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणे आढळून आली.
या मुलीचे नमुने घेतल्यानंतर आरोग्य विभागाने ते खबरदारीच्या तपासणीसाठी पाठवले आहेत.
कोरोनाच्या साथीच्या काळात या संशयास्पद प्रकरणांमुळे चिंतेत वाढ झाली आहे.

 

Web Title :- Coronavirus In Maharashtra | coronavirus scary statisticsonce again in maharashtra most patients at this place

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा