सरकारचा आदेश ! संपुर्ण राज्यातील सिनेमा-नाट्यगृहे, तलाव आणि जीम 31 मार्चपर्यंत बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे जगभरात लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यात लावण्यात आलेले काही प्रतिबंध आता आणखी वाढवण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत नाट्यगृह, सिनेमागृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून या संबंधित आदेश दिले आहेत.

पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरात अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. सतर्कता बाळगण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.