Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा वेग वाढतोय, गेल्या 24 तासात आढळले एक हजाराहून अधिक रुग्ण; ‘या’ शहरांनी वाढवली चिंता

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | जर तुम्ही करोना संपलाय असे म्हणत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्येने बुधवारी (दि.1 जून) एक हजारांचा टप्पा पार केला आहे. फेब्रुवारी नंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ झाली आहे. यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी 782 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे टेन्शन वाढत चाललं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची (Active Patients) संख्याही वाढत आहे.
आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 1081 नवे कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07 टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8 कोटी 9 लाख 51 हजार 360 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 78 लाख 88 हजार 167 (09.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 हजार 032 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई – 2970, ठाणे 452, पुणे 357 या शहरांमध्ये आहेत.
Maharashtra reports 1,081 new COVID19 cases today; Active cases stand at 4,032 including 2,970 cases in Mumbai pic.twitter.com/zUFdA9aKUS
— ANI (@ANI) June 1, 2022
मुंबईने चिंता वाढवली
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 1081 कोरोना रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्याच्या 70 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईने राज्याचे टेन्शन वाढवलं आहे. मुंबईत बुधवारी 739 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
प्रमुख शहरातील रुग्णांची संख्या
ठाणे मनपा (Thane) – 51, नवी मुंबई मनपा (Navi Mumbai) -84, वसई विरार मनपा (Vasai Virar) -15,
रायगड (Raigad) -17, पनवेल (Panvel) -18, पुणे मनपा (PMC) -68, पिंपरी चिंचवड मनपा (PCMC) 10 आणि
मीरा भाईंदर (Mira Bhayander) मनपा 17 रुग्ण आढळले आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Maharashtra reports 1,081 new COVID19 cases today; Active cases stand at 4,032 including 2,970 cases in Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Atal Pension Yojna च्या अंतर्गत पती-पत्नीला दरमहिना 10,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या वैशिष्ट्ये
- Gadchiroli Crime | बंदोबस्तासाठी पुण्याहून गडचिरोलीला गेलेल्या SRPF च्या जवानाने सहकाऱ्यावर रायफलने झाडली गोळी, नंतर केली आत्महत्या
- Mhada Exam Paper Leak Case | म्हाडा पेपरफुटी प्रकरणात प्रितीश देशमुखला जामीन