Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, रिकव्हरी रेट 98 % , जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज नवीन आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पाचशेच्या खाली आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. तसेच राज्यातील मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 407 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 967 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 11 हजार 343 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04 टक्के झाले आहे. राज्यात आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 701 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 78 लाख 75 हजार 104 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 65 हजार 705 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 6 हजार 663 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 01 लाख 32 हजार 886 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Within five hundred daily patients in the state, recovery rate 98%, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Russia-Ukraine War | वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात भारतीय मुले?, ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

 

Maratha Reservation | मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतलेले 15 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या

 

Manu Kumar Srivastava | राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती