Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 739 नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. विदर्भात तर काही ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 739 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तिघांचा पुणे शहरात आज मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 412 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे 260 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार चालू आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 1 हजार 928 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 92 हजार 501 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 574 रूग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 4 हजार 853 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशन डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं सांगण्यात आलं आहे. विना मास्क फिरणार्‍यांवर पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.