Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1949 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. गेल्या 24 तासात शहरातील 1 हजार 949 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात 840 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून तब्बल 63 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील 40 आणि पुण्याबाहेरील 23 जणांचा समावेश आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 64 हजार 916 वर पोहचला आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब अशी की आतापर्यंत तब्बल 4 लाख 44 हजार 618 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 12 हजार 330 सक्रिय रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 309 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 7 हजार 968 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 11 हजार 380 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 840 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्म आला आहे.