Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 211 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. मात्र, काही शहरांमध्ये आणि जिल्हयांमध्ये प्रादुर्भाव कायम आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Coronavirus in Pune) 211 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 302 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील 17 आणि पुण्याबाहेरील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. Coronavirus in Pune : Corona 211 new positives in Pune in last 24 hours, find out other statistics

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 75 हजार 588 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 लाख 64 हजार 505 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आता सध्या कोरोनाचे 2 हजार 559 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 387 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 8 हजार 524 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 5 हजार 724 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 211 जणांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे.

Web Title : Coronavirus in Pune | Corona 211 new positives in Pune in last 24 hours, find out other statistics

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Pune Crime News | सायबर भामट्याकडून 36 वर्षीय महिलेची फसवणूक