Coronavirus : एका दिवसात का वाढला महाराष्ट्र-दिल्लीत मृतांचा आकडा, जाणून घ्या या मागचे ‘गणित’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 54 हजारपेक्षा जास्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी सकाळी अपडेट केलेल्या आकड्यानुसार, आता देशात एकुण रूग्णांचा आकडा 3 लाख 54 हजार 65 आहे. या जीवघेण्या आजारामुळे 11 हजार 903 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 86 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

मागील 24 तांसाच्या आत 10 हजार 974 नवी प्रकरणे आणि 2003 नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात अचानक दोन हजाराची वाढ झाल्याने प्रत्येकजण चिंतेत आहेत, परंतु 2 हजार मृत्यू मागच्या 24 तासात झालेले नाहीत. प्रत्यक्षात, महाराष्ट्र आणि दिल्लीने काही मृत्यूंचे जुने आकडे जोडले आहेत. या कारणामुळे मृतांचा आकडा अचानक वाढल्यासारखा दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची मागील 24 तासांत 2701 नवीन प्रकरणे आली आणि 81 लोकांचा मृत्यू झाला आहेत. यासोबतच महाराष्ट्र सरकारने आपल्या डेटात सुधारणा करून 1328 मृत्यूंचा आकडा यामध्ये जोडला आहे, जे मृत्यू मागच्या काही दिवसांत झाले होते, परंतु रिपोर्ट देण्यात आला नव्हता. या आकड्यांमध्ये एकट्या मुंबईत 862 मृत्यू झाले आहेत.

हा आकडा जोडल्यानंतर आता महाराष्ट्रात एकुण मृतांचा आकडा 5 हजार 537 झाला आहे. एकुण कन्फर्म केसची संख्या 1 लाख 13 हजार 445 आहे, ज्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 50 हजारपेक्षा जास्त आहे. तर, 57 हजारपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाच्या एकुण केसची संख्या 60 हजारपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 3168 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत सुद्धा यापूर्वी झालेल्या 344 मृत्यूंचे उशीराने रिपोर्टिंग झाले आहे. आता दिल्लीत एकुण मृतांचा आकडा 1837 झाला आहे. दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाची 1859 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 93 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यूंचा हा सर्वात मोठा आकडा आहे. आता एकुण रूग्णांची संख्या 44 हजार 688 झाली आहे.