Coronavirus : ‘कोरोना’ संक्रमितांसाठी सरकारनं रेल्वेलाच बनवलं ‘आयसोलेशन’ वॉर्ड, नाव ठेवलं ‘जीवनरेखा’ एक्सप्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाव्हायरसचे वाढते प्रकरण लक्षात घेता भारत सरकारने रेल्वे डब्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून त्या ट्रेनचे नाव जीवनरेखा एक्सप्रेस ठेवण्यात आले आहे. यासाठी रेल्वेने दिल्ली डेपोत कोच तयार करण्याचा प्रयत्न केला होता, हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर इतर एलएचबी कोचला देखील आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले जात आहेत.

 

 जीवनरेखा एक्सप्रेस में डॉक्टर्स के लिए केबिन बनाने के साथ ही अन्य कोचों में पेशेंट रूम बनाए गए हैं, जिसे रेलवे ने जीवन रेखा एक्सप्रेस नाम दिया है.

जीवनरेखा एक्स्प्रेसमध्ये डॉक्टरांसाठी केबिन बनवण्याव्यतिरिक्त इतर डब्यांमध्येही पेशंट रूमही तयार करण्यात आल्या आहेत. या गाड्या कोरोना रूग्णांना देशाच्या कानाकोपऱ्यात उपचार देतील. जीवन रेखा एक्स्प्रेसमध्ये रेल्वे वैद्यकीय विभागाच्या पथकाव्यतिरिक्त रेल्वे कर्मचार्‍यांची टीम असणार आहे. रूग्णांवर उपचार करण्यासाठी, डब्ल्यूएचओने बनविलेल्या व्हिडिओंचे प्रशिक्षण देऊन रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, जीवनरेखा एक्सप्रेसची चाचणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागले. भारतात कोरोना संक्रमित रूग्णांच्या आकड्याने १०००चा आकडा पार केला आहे. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.