Coronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’ चूका, ‘या’ 5 गोष्टींवर लक्ष द्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरूच आहे. त्यामुळे हात स्वच्छ ठेवणे आणि शारीरिक अंतर पाळणे याचे पालन केले जावे यासाठी लोकांना आवाहन करण्यात येत आहे. यासोबत सर्वांना मास्क वापरण्याचाही सल्ला दिला जातोय. दरम्यान अनलॉक अंतर्गत आर्थिक घडामोडी या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. म्हणून मास्क परिधान करणे ही काळजी गरज ठरत आहे, जेणेकरून संसर्ग टळू शकेल. दरम्यान मास्क वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणे फार महत्वाचे आहे.

नाक आणि तोंड व्यवस्थितरीत्या झाकावे

लोक नेहमीच एक चूक करतात ती म्हणजे मास्कने फक्त नाकाला झाकतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. चांगल्या मास्कचा वापर करून नाक आणि तोंड नीट झाकावे.

मास्क दोन्ही बाजूंनी वापरणे टाळावे

कोणत्याही मेडिकल मास्क अथवा सर्जिकल मास्कने हे समजते की त्यास कसे परिधान करायचे आहे, त्यामुळे त्यानुसारच त्याचा वापर करावा. जर आपण घरी बनवलेले फेस कव्हर परिधान करत असाल तर याची काळजी घ्यावी की त्याच्या दोन्ही बाजू या स्वच्छ असाव्यात. जेव्हा त्याचा तुम्ही दोन्ही बाजूंनी वापर करता तेव्हा बाहेरील बाजूला जमा झालेल्या पॅथोजनच्या संपर्कात तुम्ही येतात.

मास्कला सतत स्पर्श करू नये

जर तुम्ही मास्कचा वेळोवेळी स्पर्श करणे टाळले तर ते आपल्यासाठीच फायदेशीर आहे. जेव्हा तुम्हाला मास्क काढायचा असेल किंवा परिधान करायचा असेल तेव्हा त्याच्या साईडच्या दोरीचा वापर करावा. तसेच जेव्हा मास्कला आपण स्पर्श कराल तेव्हा हातांना व्यवस्थित सॅनिटाईझ करावे.

खराब झालेल्या आणि ओल्या फेस मास्कचा वापर करणे टाळावे

मास्क वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कापडाच्या मास्कचा वापर करत असाल त्यास स्वच्छ धुवावे. त्यास गरम पाण्याने आणि डिटर्जेंटच्या साहाय्याने व्यवस्थितरीत्या धुवून उन्हात वाळत टाकावे.