‘कोरोना’ने धोक्याची परिसीमा गाठली, ‘या’ देशात Major Incident ची घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ( Boris Johnson) यांनी 6 जानेवारीपासून लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र दिवसेंदिवस संकट आणखी गंभीर होत असल्याने लंडनचे महापौर सादिक खान यांनी परिस्थिती पाहता Major Incident ची घोषणा केली आहे.

महापौर खान म्हणाले की, कोरोनाच्या संकटाने आता धोक्याची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे मी लंडनमध्ये Major Incident ची घोषणा केली आहे. लंडनमधील दर 30 नागरिकांमागे एका नागरिकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आपण आताच तातडीने पावले उचलली नाहीत, तर आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढवून मृतांचा संख्या वाढेल, असे खान यांनी ट्विटरद्वारे सांगितले. लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याची बाब खान यांनी मांडलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. जिथे मॅकेनिकल व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच लंडनमधील नागरिकांना आताच सतर्क केले नाही. तर त्यांना आयुष्याशीच मोठी तडजोड करावी लागेल, असा इशारा देखील स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांची लॉकडाऊनची घोषणा
कोरोनाचे संकट पाहता मार्चपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारण, वैद्यकिय कारण, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबीक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणांनीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना दिल्याचे जॉन्सन यांनी नमूद केले आहे. इंग्लंडमधील शाळा, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय याच्यावर देखील परिणाम होणार आहे. तसेच खुल्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा प्रकारांवरही यादरम्यानं बंदी घातली आहे.