Covid-19 प्रतिबंधक व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोना होण्यावरून AIIMS चे संचालक गुलेरिया यांनी सांगितली ‘ही’ बाब, म्हणाले…

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. लोक अस्वस्थ झाले आहेत. महामारीच्या या विध्वंसक रूपामुळे चिंताग्रस्त झालेल्या लोकांची चिंता दूर करण्यासाठी आणि कोरोनासंबंधी मुद्द्यांवर बोलण्यासाठी देशातील तीन मोठ्या डॉक्टरांनी एक पत्रकार परिषद घेतली.

डॉक्टरांच्या या पॅनलमध्ये एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया, नारायण हेल्थचे चेयरमन डॉ. देवी शेट्टी आणि मेदांताचे चेयरमन डॉ. नरेश त्रेहन सहभागी झाले होते. या डॉक्टरांनी कोरोनासंबंधी महत्वाची माहिती दिली.

काही लोकांना व्हॅक्सीनचे दोन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग होत आहे, यामुळे काही लोकांचा व्हॅक्सीनवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. यावर डॉक्टर गुलेरिया म्हणाले, व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो, परंतु रूग्ण गंभीर होणार नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोनाने मृत्यूचा धोका अतिशय कमी होतो.

डॉक्टर गुलेरिया म्हणाले…
* कोरोना व्हायरसची लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावा. जवळपासच्या लोकांनी व्हॅक्सीन घेतलेली नसते. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. खोलीत व्हेटिलेशन चांगले ठेवा.

* 85 टक्के रूग्ण स्टेरॉईड किंवा कोणत्याही संबंधीत औषधाने घरीच बरे होऊ शकतात. काही लक्षणे असू शकतात पण औषध, व्हिटॅमिन, एक्सरसाईज आणि सकारात्मक विचारांनी बरे होऊ शकतात.

डॉक्टर नरेश त्रेहान म्हणाले…
* कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हॉस्पिटलकडे धावत सुटू नका. दवाखान्यात गेलो तरच वाचू, हे आवश्यक नाही. तुम्ही असिम्टोमॅटिक असू शकता. अशावेळी डॉक्टर घरीच राहायला सांगतील. आयसोलेट व्हा, मास्क, घाला, ऑक्सीजन लेव्हल चेक करत राहा.

* ऑक्सीजन सॅच्युरेशन 94% च्या वर असेल तर काहीही समस्या नाही, परंतु जर व्यायाम केल्यावर यामध्ये घसरण होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. अशावेळी योग्य वेळी उपचार मिळणे आवश्यक आहे.

* शरीरात वेदना, सर्दी, खोकला, अपचन, उलटी यासारखी लक्षणे असतील तर कोरोना टेस्ट आवश्यक करा. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास अजिबात घाबरू नका.