चिंताजनक ! संपूर्ण जगाला विळखा घालणार नवा कोरोना; अभ्यासकांकडून चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले होते. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह इतर काही देशांनी लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, या व्हायरसचा संसर्ग कमी झाल्याची माहिती येत असताना आता नवी चिंताजनक बातमी समोर येत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होत आहे. पण नवंनव्या प्रकारातील कोरोना हा एक गंभीर विषय बनत आहे. यामध्ये सर्वाधिक संक्रमण हे ब्रिटनच्या केंट भागात पसरल्याचे सांगितले जात आहे. वैज्ञानिकांनी याबाबत दावा केला, की कोरोना व्हायरसचा हा नवा प्रकार लवकरच संपूर्ण देशाला विळखा घालणार आहे. इतकेच नाही तर यातून बाहेर येण्यासाठी एक दशक इतका कालावधी लागू शकतो.

याबाबत UK च्या जेनेटिक सर्व्हिलन्स प्रोग्रॅमच्या प्रमुखांनी सांगितले, की दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोना व्हायरसचा प्रकार आता संपूर्ण जगात लवकरच पसरण्याची शक्यता आहे. या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो.

50 पेक्षा जास्त देशात नवा कोरोना स्ट्रेन
इंग्लंडच्या या नव्या प्रकारात 50 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की इतर प्रकारच्या तुलनेत हा प्रकार 70 टक्क्यांपेक्षा जास्त संक्रमक आणि जवळपास 30 टक्क्यांपेक्षा घातक आहे.

सर्वच प्रकार जीवघेणे नाहीत
कोरोनावर अभ्यास करणाऱ्या अनेकांनी सांगितले, की ‘कोरोना व्हायरसचे वेगवेगळ्या स्ट्रेन लोकांवर विविध प्रकारे प्रभाव टाकतो. पण कोरोनाचे सर्वच प्रकार जीवघेणे नसतात. असे असले तरीही तुम्हाला खबरदारी घ्यायला हवी’.