Coronavirus : ‘कोविड’ बरा झाल्यानंतर लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास तात्काळ सावध व्हा, अन्यथा फेल होऊ शकतात ‘ऑर्गन’

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – आता कोरोना (Coronavirus) ची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण अधिक दिसत आहे. कोरोनामधून बरं झाल्यावर लहान मुलांमध्ये मल्टी इंफ्लामेट्री सिंड्रोम आढळून येत आहे. ही इंफ्लामेट्री स्थिती कवास्की सिंड्रोमसारखी असते. ज्यात कोरोनाने ग्रस्त रूग्णांमध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. कोरोनातून बरं झाल्यावर नव्याने समोर आलेल्या या समस्या दूर होण्यास ६ महिन्यांचा वेळ लागू शकतो. मल्टी इंफ्लामेट्री सिंड्रोमचे जास्तीत जास्त संकेत हे सूज येण्याशी संबंधित आहेत आणि यावर उपचार करणं गरजेचं आहे. या समस्येवर झालेल्या रिसर्चच्या रिपोर्टनुसार, या समस्येचे संकेत सर्वातआधी त्वचेवर बघायला मिळतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, एमआयएस-सीच्या जास्तीत जास्त केसेस कोरोनानंतर समोर येतात. जेव्हा इम्यून सिस्टीम कोरोनासोबत लढत असतं. तेव्हा संपूर्ण शरीरात सूज वाढते. तेव्हाच या सिंड्रोमची स्थिती निर्माण होते. अशात या सूजेसंबंधी संकेत, ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या रूपात समोर येतात. किंवा जास्तीत जास्त संकेत त्वचेवरून दिसतात. या माहितीवरून जास्तीत जास्त लोक हेच मानत आहेत की, त्वचेवर असामान्य रिअॅक्शन एमआयएस-सीचे सुरूवातीचे संकेत असू शकतात. JAMA डर्माटोलॉजीमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चनुसार, लहान मुलांमध्ये एमआयएस-सीचे सुरूवातीचे संकेत त्वचेवर असलेल्या म्यूकस मेंब्रेसच्या माध्यमातून जाणून घेता येऊ शकतात.

आता वैज्ञानिकांनी पालक आणि डॉक्टरांना इशारा दिला आहे की, अनेक कारणांनी लहान मुलांमध्ये त्वचेसंबंधी लक्षण,ॲलर्जी आणि इन्फेक्शन दिसतात.
ज्यांचा संबंध कोरोनासोबत असू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर योग्य ते उपचार घ्या. एमआयएस-सीने ग्रस्त हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या ३५ लहान मुलांची लक्षणे बघितल्यावर वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांना आढळून आलं की, यातील ८३ टक्के रूग्णांच्या त्वचेवर म्यूकोसलचे लक्षण होते. ज्यात रॅशेज, सूज, लाल चट्टे यांचा समावेश होता. ही सर्व लक्षणे एमआयएस-सी च्या सुरूवातीच्या काळात दिसतात.

या समस्येशी संबंधित डेटामधून समजलं की, एमआयएस-सीची समस्या जास्तीत जास्त केसेस ५ ते १४ वर्षाच्या मुलांमध्ये आढळून आली आहे. तसेच एमआयएस-सी ही एक गंभीर स्थिती आहे. आणि जास्तीत जास्त लहान मुले मेडिकल ट्रिटमेंटने ठीक होत आहेत. वेळीच याचे संकेत ओळखले तर समस्या जस्त होण्यापासून रोखली जाऊ शकते. या समस्येचे काही संकेत खालीप्रमाणे त्वचेवर दिसू शकतात.

– लाल चट्टे

– हात किंवा पायांजवळचा रंग उडणे

– जिभेचा रंग स्ट्रॉबेरीसारखा होणे

– ओठ फाटणे

– हात आणि पायांवर सूज

– शरीरावर रॅशेज

त्वचेवर हे संकेत दिसतात. आणि सोबतच याच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे लालसर होणे, सतत थकवा जाणवणे, चिडचिड होणे, पोटात दुखणे, संभ्रम वाढे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि लघवी कमी येणे हेही लक्षणे आहेत.

हे देखील वाचा

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा

‘चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा’ ! अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांनी दिलं उत्तर

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा
ट्विटर ला देखील फॉलो करा