Covaxin and Covishield | संशोधकांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हॅक्सिन’ पेक्षा ‘कोव्हिशिल्ड’ सरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. त्यातच देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन Covaxin या लसी उपलब्ध आहेत. पण या दोन्ही लसीसंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे. कोव्हिशिल्ड लसीमुळे शरीरात अधिक प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण होतात. कोरोना व्हॅक्सिन इंडक्टेड अ‍ॅण्टीबॉडीज टीट्री अंतर्गत केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता. कोरोनाचा संसर्ग न झालेल्या मात्र दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीच या संशोधनासाठी निवड केली होती.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन Covaxin दोन्ही लसींचे दोन डोस घेतल्यानंतर मोठ्या संख्येने अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण होत आहेत.
मात्र सेरोपोझिटिव्हिटी आणि अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण हे कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये अधिक असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
अभ्यासात 552 आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.
यापैकी 325 पुरुष तर 227 महिला होत्या.
456 जणांना कोव्हिशिल्डचा तर 96 जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला.
पहिल्या डोसनंतर 79.3 टक्के आरोग्य कर्मचा-यांच्या शरीरात सेरोपोझिटिव्हिटी रेट दिसून आला. कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये अ‍ॅण्टी-स्पाइक अ‍ॅण्टीबॉडीजचे प्रमाण हे कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांपेक्षा अधिक होते.
कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाणे 86.8 तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये 43. 8 टक्के इतके होते, असे अहवालात म्हटले आहे.

सध्या देशात सर्वच स्तरामध्ये सुरु असणा-या कोरोना व्हॅक्सिन इंडक्टेड अ‍ॅण्टीबॉडीज टीट्री अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसंदर्भात अभ्यास करण्यात आला.
यात यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि न झालेल्यांवर वेगवेगळ संशोधन करण्यात आले आहे. सार्क कोव्ही-2 अ‍ॅण्टी-स्पाइक बाईण्डींग अ‍ॅण्टीबॉडीज कर्मचाऱ्यांच्या शरीरात निर्माण झाल्या आहेत की नाही.
हे पाहण्यासाठी लस दिल्यानंतर 21 दिवस तसेच,
दुसऱ्या डोसला 6 महिने पूर्ण होण्यापूर्वीच 4 वेळा नमूने घेतल्याचे अभ्यासात नमूद केले आहे.
मात्र दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन्ही लसी परिणामकारक पद्धतीने,
विषाणूंना तोंड देऊ शकणारी प्रतिपिंडे शरीरामध्ये तयार करत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)