Coronavirus : उन्हाळ्यात ‘कोरोना’ संपुष्टात येईल ? AC मध्ये धोका वाढतो ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूची सुमारे एक लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि मृतांचा आकडा 3300 च्या वर पोहोचला आहे. भारतातील कोरोना रूग्णांची संख्या 31 आहे, यातील 3 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत.

आतापर्यंत Covid-19 उद्रेक होण्याचे कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. तथापि, हे टाळण्यासाठी, संक्रमित व्यक्तीपासून दूर राहण्याचा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण एकमेकांशी संपर्क साधताना हा विषाणू वेगाने पसरतो.

कोरोना विषाणू संपूर्ण जगासाठी चिंतेचे कारण बनले आहे, असा दावा केला जात आहे की उन्हाळ्याचा हंगाम येताच कोरोना विषाणू संपेल कारण जास्त तापमानात हे विषाणू कमकुवत होतात.

एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू टेबल, डोअर हँडल, फोन आणि कीबोर्ड सारख्या सपाट पृष्ठभागावर राहू शकतो हा विषाणू ५ दिवसांपर्यंत 22 ते 25 डिग्री तापमानात 40-50 टक्के आर्द्रतेत राहू शकतो. अशी परिस्थिती एसीच्या वातावरणात राहू शकते

Indian Council of Medical Research च्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, 38 डिग्री सेल्सिअस आणि 95 टक्के आद्रता असल्यास कोरोना व्हायरस ची क्षमता संपुष्टात येऊ लागते. घराच्या बंद तापमानात या विषाणूचा धोका अधिक असतो.

कोरोना विषाणू कमी-तापमान असलेल्या ठिकाणी अधिक वेगाने पसरत आहे, तर मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडसारख्या उष्ण देशांत अशी घटना फार कमी घडली आहेत. तथापि, जगभरातील सर्व शास्त्रज्ञांची मते भिन्न आहेत.