Coronavirus : ‘कोरोना’वरील लस कधी येणार ? PM नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान

पोलिसनामा ऑनलाइन – देशातील विविध राज्यांमधील गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तेथील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतील. कोरोनाबाबत पुढील आराखडा जाणून घेतला. यावेळी उपस्थित असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियोजित आराखडा, लसीकरणाबाबत आपली भूमिका मांडली.

उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

कोरोनावरील लास कधीपर्यंत येईल हे याची निश्चित वेळ आह्मी सांगू शकत नाही. हे फक्त पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून थांबवता येणार नाही. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाबाबत चांगल्या स्थितीत आहे. कोरूना मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचा विचार केल्यास ते निदर्शनास येईल. श्रेय सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नासं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील उपाययोजना पंतप्रधानांना माहिती दिली. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूट आदर पूनावाला यांच्याशी सातत्याने संवाद साधत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रीतीने करावे, लसीचे वितरण यासंदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गांवरही प्रवाशांनाही निर्बंध लागू असणार आहेत. कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्ट रिपोर्ट अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असेल तरच प्रवेश मिळेल तर पॉझिटिव्ह असलेल्यांना सेंटरमध्ये राहावे लागेल. यावेळी रिपोर्ट नसलेल्यांची टेस्ट केली जाईल. चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना कोरोना रिपोर्ट सादर करावा लागेल. त्यांना प्रवाशाच्या ९६ तास आधी ही चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने प्रवाशांची बॉर्डरच्या चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. लक्षणे असलेल्यांचे अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचार खर्च त्यालाच करावा लागणार आहे.

विमान प्रवाशांसाठी नियमावली

– विमानतळावर उतरल्यानंतर कोरोनाची चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
– ही चाचणी प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासात केलेली असावी.
– तपासणी न केलेल्यांना विमानतळावर स्वखर्चाने तपासणी करून घ्यावी लागेल.
– कोरोना चाचणी केंद्र असेल.
– तपासणीनंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल.
– प्रवाशांना फोन क्रमांक, घर पत्ता द्यावा लागेल
– रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंग वेळी घेण्यात येईल.