Corporator Maya Barne | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आणखी एक धक्का ! नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Maya Barne | आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी (PCMC Elections) पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) एकामागून एक झटके बसत आहे. यापूर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर आता नगरसेविका माया बारणे (Corporator Maya Barne) यांनी राजीनामा दिला आहे. माया बारणे यांनी पक्षावर नाराज होत राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माया बारणे या थेरगावचे (Thergaon) प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आज (शुक्रवार) महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांच्याकडे दिला.

 

यापूर्वी भाजपचे वसंत बोराटे (Corporator Vasant Borate), चंदा लोखंडे (Corporator Chanda Lokhande), तुषार कामठे (Corporator Tushar Kamathe) यांनी राजिनामा दिला आहे. त्यानंत आज प्रभाग क्रमांक 24 थेरगावचे महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या माया बारणे (Corporator Maya Barne) यांनी आज (शुक्रवारी) भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. माया बारणे यांनी राजीनामा दिल्याने भाजपला हा चौथा मोठा धक्का बसला आहे.

भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी सांगितले. माया बारणे यांची ही दुसरी टर्म होती. 2012 मध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकीटावर निवडून आल्या होत्या. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग 24 थेरगावमधून भाजपच्या चिन्हावर दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. मागील पाच वर्षात पक्षाने एकही पद दिले नाही. त्यामुळे पक्षावर नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा आहे.

 

दरम्यान, माया बारणे यांचे पती आणि माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे (Santosh Barne) यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
त्यामुळे माया बारणे या राजीनामा देणार हे निश्चित होते. अखेर आज माया बारणे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

 

Web Title :-  Corporator Maya Barne | BJP corporator maya barne resigns give resignation letter to PCMC Commissioner Rajesh Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा