Corporator Pramod Bhangire | महंमदवाडी येथील जय भवानी चौकाचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील महंमदवाडी (Mahammadwadi) येथील जय भवानी चौक (Jai Bhavani Chowk) ते न्यातीच्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण व सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी न्याती काउंटी रेसिडंट्स फोरमच्या (Nyati County Residents Forum) सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करताना नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांचे आभार मानले. कोरोना (Corona) काळात सर्वत्र भितीचे आणि नकारात्मक वातावरण असताना नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी प्रभागातील नागरिकांची विशेष काळजी घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवल्याची भावना सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

महंमदवाडी येथील जय भवानी चौक ते न्यातीच्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण व सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) , पुनीता रंजन (Puneeta Ranjan), दिपा चिमा, दिपा बीड, शुब्रा सिंग, पलक मेहता, ईशानी चौपेला, सकिना पुनावाला, अवंतिका वैलुर, सौम्या माथूर, एलेना मार्शल, अभिमन्यू भानगिरे, हर्षद दातार, रामसिंग, संदीप कोलाटकर, सतीश राजीवडे, सचिन तरवडे, प्रवीण खरात, न्याती काउंटी रेसिडन्स फोरमचे सर्व सभासद उपस्थित होते.

 

नगरसेवक भानगिरे यांनी आजवर या भागात अनेक चांगली कामे केली आहेत. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवले आहे. चौकाचे सुशोभीकरण केले, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले, संरक्षक भिंतीवर वॉल आर्ट (Wall Art) केले. यामुळे परिसर सुंदर आणि स्वच्छ झाला आहे. ही सर्व कामे प्रमोद भानगिरे यांनी केल्याची माहिती काउंटी रेसिडंट्‌स फोरमच्या सभासदांनी दिली.

नगरसेवक प्रमोद भानगिरे म्हणाले, प्रभाग क्र. 44 व 46 हे दोन्हीही प्रभाग स्वच्छ व सुंदर असावेत, असा माझा मानस आहे.
त्यानुसार टप्याटप्याने सुशोभीकरण करून आवश्‍यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तसेच, सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर वॉल आर्टही करण्यात आले आहे. यामुळे यातून स्वच्छ व सुंदर पुणे असा संदेश जाणार आहे.

 

Web Title :- Corporator Pramod Bhangire | Beautification of Jai Bhavani Chowk at Mahammadwadi Dedication of CCTV Camera

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा