कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण: दोघांना अटक, पाच जणांचा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील सायबर क्राईम सेलने कॉसमॉस बॅंकेच्या हॅकिंगच्या संदर्भात दोन आरोपींना मंगळवारी (दि.११) अटक केली. तर पाच जणांनी कोल्हापूर येथून एटीएममधून पैसे काढले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मागील महिन्यात कॉसमॉस बँकेच्या पुण्यातील मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी १५ हजारांहून अधिक व्यवहारांद्वारे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकला होता.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’769ee78b-b5df-11e8-9c68-d93bd4b69f24′]

फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहम्मद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फहीम शेख आणि फहीम खान यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत. या दोन आरोपींनी त्यांच्या पाच साथीदारांच्या मदतीने कोल्हापूरमधील एटीएममधून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याचे तपासात समोर आलं आहे. हे पैसे काढण्यासाठी त्यांनी ९५ क्लोन डेबिट कार्ड वापरले होते.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मालवेअर हल्ला होता. हाँगकाँगमध्ये अनोळखी व्यक्ती आणि एएलएम ट्रेडिंग लिमिटेडच्या विरोधात बँकेने तक्रार नोंदवली आहे. हाँगकाँगमध्ये हाँगकाँग बँक खात्यात १३ कोटी ९२ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्य कार्यालय येथे एटीएम स्विच (सर्व्हर) ११ ऑगस्टला दुपारी ३ ते १० दरम्यान हॅक करण्यात आले. हॅकरने व्हिसा आणि रूपे डेबिट कार्डधारकांची माहिती चोरली होती. व्हिसा कार्डाच्या बारा हजार व्यवहारांमध्ये त्यांनी ७८ कोटी रूपये ट्रान्सफर केले. त्याचप्रमाणे रूपे कार्ड धारकांच्या २ हजार ८४९ व्यवहारांमध्ये २ कोटी ५ लाख रुपये भारतात ट्रान्सफर करण्यात आले. हॅकर्सने पुन्हा १३ ऑगस्टच्या सकाळी साडेअकरा वाजता १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँग बँकेतील एएलएम ट्रेडिंग लिमिटेड खात्यात जमा केले गेले.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e2a5d26-b5df-11e8-a60f-a147402e41f5′]

बँक अधिकारी सुहास गोखले (वय-५३) यांच्या तक्रारीवरून चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 420 (फसवणूक), 37 9 (चोरी), 120 बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी