नको त्या अवस्थेत आढळलं जोडप, लोकांनी ‘डुगडुगी’ वाजवत ‘अर्धनग्‍न’ अवस्थेत काढली ‘धिंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यात एका महिला आणि पुरुषाला गावातील पंचायतीने तुघलकी शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे. येथील एका महिला आणि पुरुषाला अवैध संबंध करताना पकडल्याने गावकऱ्यांनी पंचायतीच्या आदेशावरून मुंडन करण्यात आले. त्यानंतर महिला आणि पुरुषाची चपलांचा हार घालून गावातून अर्धनग्न अवस्थेत मिरवणूक काढली.

आपत्त‍िजनक हालत में म‍िला कपल, डुगडुगी बजा अर्धनग्न कर न‍िकाली परेड

या दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पकडल्यानंतर पंचायतीने हे तुघलकी फर्मान सुनावत पुरुषाचे मुंडन केले आणि दोघांची गावातून अर्धनग्न मिरवणूक काढण्यात आली. पुरुषाला केवळ टी-शर्ट आणि अंतर्वस्त्रावर गावातून फिरवण्यात आले तर महिला देखील अर्धनग्न अवस्थेत होती. यावेळी स्थानिक वाद्य वाजवत या दोघांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.

आपत्त‍िजनक हालत में म‍िला कपल, डुगडुगी बजा अर्धनग्न कर न‍िकाली परेड

दरम्यान, पोलिसांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, बुधवारी महाराजपुर मीना बाजारात एका महिला आणि पुरुषाची धिंड काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो. त्यानंतर दोघानांही ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींकडून कोणतीही तक्रार दाखल झाल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपत्त‍िजनक हालत में म‍िला कपल, डुगडुगी बजा अर्धनग्न कर न‍िकाली परेड

Visit – policenama.com