‘त्या’ पोलीस अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्ह्याचे दोषारोपत्र तयार करताना बनावट पुरावे तयार केल्याप्रकरणी मानव संशोधनचे पोलीस अधीक्षक आनंद भाेईटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. भोईटे हे नगरमध्ये पोलीस उपअधीक्षक असताना निघोज येथील संदिप वराळ खून प्रकरणात ते तपासी अधिकारी होते. या आदेशामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Anand-Bhoite

निघोज हत्याकांडाच्या गुन्ह्यात बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बबन कवाद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २०१८ साली क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती नलावडे व न्यायमूर्ती सोनवणे यांच्यासमोर सुनावणी झाली. तपासी अधिकारी असलेल्या भोईटे यांनी बनावट पुरावे तयार केले, असा आरोप याचिकाकर्ता बबन कवाद यांनी केला होता.

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने भोईटे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १६७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भोईटे हे सध्या मानव संशोधन पुणे येथे नियुक्तीस आहेत.

आरोग्यविषयक वृत्त