Covid-19 symptoms : ‘कोरोना’चे आणखी एक धोकादायक लक्षण आले समोर, थंडीत बहुतांश लोक होत आहेत ग्रस्त

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस एक असा धोकादायक आजार आहे ज्यास शास्त्रज्ञ अजून समजून घेऊ शकलेले नाहीत. हा आजार आलेल्यास उद्या एक वर्ष होणार आहे आणि अजूनही याच्यासंबंधीत काही नवीन माहिती समोर येत आहे. हा अभ्यास युएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, तुम्ही या घातक व्हायरसची सर्वात सामान्य लक्षणे खोकला, श्वास घेण्यास अडथळा आणि ताप याबाबत जाणता, परंतु नुकत्याच एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस मानवाच्या शरीराच्या मस्कुलोस्केलेटल सिस्टमला सुद्धा प्रभावित करतो, ज्यामुळे खुप वेदना होतात. मांसपेशीमध्ये वेदना होते म्हणजे मायलजीया सुद्धा कोविड-19 चे संभाव्य लक्षण असू शकते.

मायलजीया काय आहे?
मायलजीया मांसपेशीतील वेदनेची एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे रूग्णाला वेदना जाणवतात. यामुळे लिगमेंट्स, टेन्डस अमजा फेसियामध्ये वेदना होऊ शकतात, या नाजूक ऊतक मासपेशी हाडे आणि अंगांना जोडतात.

जगतिक आरोग्य संघटनेच्या अलिकड्या रिपोर्टमध्ये, चीनमध्ये 55,924 प्रकरणात 14.8 टक्के रूग्णांमध्ये मायलजीयाची लक्षणे दिसून आली. मांसपेशीमध्ये वेदनेला घशात खवखवणे, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याच्या तुलनेत कोविड-19 च्या जास्त संभाव्य लक्षणाच्या रूपात ओळखले जाते.

कोरोनाची सामान्य लक्षणे

सुखा खोकला, थकवा यांचा समावेश आहे.

कमी सामान्य लक्षणे
सामान्य लक्षणांमध्ये वेदना आणि त्रास, घशात खवखव, कफ, डोळे येणे, डोकेदुखी, चव किंवा वास गमावणे, त्वचेवर रॅश येणे, बोटे किंवा पायांच्या बोटांचे मलिनकिरण इत्यादीचा समावेश आहे.

कोरोनाची गंभीर लक्षणे
कोरोनाच्या गंभीर लक्षणात श्वास घेण्यास त्रास होणे तसेच छातीत वेदना किंवा दबाव जाणवणे. वरील पैकी कोणतीही लक्षणे आढल्यास तोबडतोब सरकारी डॉक्टरांकडे जा.