Corona Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान ‘बेसहारा’ महिलेच्या मृत्यूनंतर ‘मुलं’ बनले पोलिस कर्मचारी, खांदा देऊन केलं अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशच्या सहारनपुरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या यूपी पोलिसांचा माणुसकीचा चेहरा समोर आला आहे. येथे, बडगाव पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावत निराधार आजारी महिलेचा जीव वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले परंतु महिला आजाराशी आणि आपल्या एकाकी जीवनाशी लढू शकली नाही आणि तिला आपला जीव गमवावा लागला.

एसएसआय दीपक चौधरी यांनी उपचारासाठी पाठवले होते

खरं तर बडगाव पोलिस ठाण्यात तैनात एसएसआय दीपक चौधरी यांनी मीना या आजारी निराधार महिलेला आपल्या हातांनी जेऊ घातले आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अन्य कुणी नातेवाईक नसल्यामुळे त्या महिलेस शासकीय आरोग्य केंद्रात पोलिसांच्या गाडीवर नेण्यात आले. उपचारादरम्यान, 55 वर्षीय मीना या महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मीना यांच्या मृत्यूची माहिती मिळताच एसएसआय दीपक चौधरी आपल्या पोलिस सहकाऱ्यांसह किशनपूर गावात पोहोचले आणि त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

मृत्यूची खबर मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून महिलेवर केले अंत्यसंस्कार

यानंतर एसएसआय दीपक चौधरी आणि त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल गौरव कुमार, विनोद कुमार यांनी महिलेच्या अंतिम यात्रेत सहभागी होऊन महिलेच्या मृतदेहास खांदा दिला. लॉकडाऊन व सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत पोलिसांनी महिलेचा अंतिम संस्कार केला.