Covid New Variant JN 1 | सतर्क राहा, घाबरू नका! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Union Health Minister Dr. Mansukh Mandaviya) यांनी देशातील नागरिकांना केले आहे. ते कोविड (Covid New Variant JN 1) संदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. दक्षिणेतील अनेक राज्यासह देशात कोविडच्या (Covid New Variant JN 1) रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने (Central Govt) या बैठकीचे आयोजन केले होते. चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे यासह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्यासह विविध राज्यांचे आरोग्य मंत्री, उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेतील कोविड रुग्णात झालेली वाढ पाहता आपल्याही कोविडच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी तयार राहावे लागेल. सणांचे दिवस पाहता सतर्कता आवश्यक आहे.

डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, कोविड अद्याप संपलेला नाही. देखरेख ठेवा. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल. राज्यांनी कोविड चाचण्या वेगाने कराव्यात. कोविड पॉझिटिव्ह आणि निमोनियासारख्या आजारांचे जास्तीत जास्त नमुने दररोज तपासणीसाठी पाठवा ज्यामुळे जीनोम सिक्वेसिंगमधून नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला जाईल.

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, रुग्णालयांच्या तयारीसाठी मॉक ड्रिल करणे, निगराणी वाढवणे आणि लोकांशी बोलणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करण्याची गरज आहे

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविडचे (Covid New Variant JN 1) सक्रिय रुग्ण खूपच कमी आहेत.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, सध्या देशात कोविड सब-व्हेरियंट जेएन.१ ची २१ प्रकरणे आहेत.
देशात कोविडचे २३११ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी ५१९ प्रकरणे नोंदवली गेली.
नवीन व्हेरिएंटबद्दल घाबरण्याची गरज नाही, कारण हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असला तरी आजार सौम्य आहे.
सर्दी-खोकला होतो. मागील दोन आठवड्यात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु या लोकांना आधीच इतर अनेक
गंभीर आजार होते. काहींना हृदयविकार तर काहींना कर्करोग झाला होता.
कोविड त्याचे रुप बदलतो. देशाला सतर्क राहावे लागेल.

देशातील जेएन.१ कोविड व्हेरिएंटची स्थिती

  • कोविड जेएन.१ च्या नवीन सब व्हेरिएंटचे २१ रुग्ण सापडले. त्यापैकी १८ गोव्यातील.
  • सध्या चिंतेचे कारण नाही. जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे झाले.
  • आयसीएमआर या व्हेरिएंटच्या जीनोम चाचणीवर काम करत आहे.
    हा व्हेरिएंट कोविडच्या वाढत्या प्रकरणांचे कारण आहे.
  • अधिक जीनोम चाचणी केली जात असल्याने या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढेल.
  • लक्षणे सौम्य आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी.
  • ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये जेएन.१ पहिला रुग्ण सापडला. ७९ वर्षीय महिलेच्या आरटी-पीसीआर चाचणीत आढळून आला. ती बरी झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार

महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला मारण्याची धमकी, पुणे कॅम्पमधील प्रकार

पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल