Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला मारण्याची धमकी, पुणे कॅम्पमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला व्हिडिओ कॉल करुन अश्लील शिवीगाळ केली. तसेच भेटण्यास नकार दिल्याने पतीला मारुन टाकण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत पुणे कॅम्प (Pune Camp) येथे घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Pune Police) एकावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पुणे कॅम्प येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरुन सिद्धार्थ जाधव Siddharth Jadhav (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354 ड, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ जाधव याने फिर्यादी महिलेसोबत इन्स्टाग्रामवर (Instagram)
ओळख केली. त्यानंतर त्याने महिलेला वारंवार व्हिडिओ कॉल केले. मात्र फिर्यादी यांनी त्याचे फोन घेतले नाहीत.
त्यामुळे त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन फोन उचलला नाही तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली.
तसेच त्याने महिलेला भेटण्यासाठी बोलावले. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला फोन करुन पतीला मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, स्थानिक गुन्हे शाखेत कार्य़रत असणाऱ्यावर FIR

लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला चोरीचा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना केला परत