Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार, दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मारहाण करुन बलात्कार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार पीडित मुलगी अल्पवयीन असल्यापासून घडला आहे. याप्रकरणी दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात (Pune Police) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2016 ते आजपर्यत सोमवार पेठ तसचे कात्रज येथील लॉजमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सोमवार पेठेत राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने बुधवारी (दि.20) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सिजु समीर शेख (वय-26) आणि सोफीयाना सिजु शेख (वय-25 पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 376/2/एन, 377, 323, 504स 506, पोक्सो अॅक्ट (POCSO Act) कलम 8 व 12, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिजु शेख याने पीडित मुलगी अल्पवयीन (Minor) असताना तिच्यासोबत ओळख वाढवली. यानंतर तो मुलीच्या घरी भाड्याने राहू लागला. याच दरम्यान त्याने मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले. फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित मुलीच्या घरी आणि कात्रज येथील लॉजवर नेवून तिला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

तसेच सिजु शेख याने पीडित मुलीच्या वडिलांना त्यांच्या मोबाईलवर फोन करुन शिवीगाळ करुन
मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. तर आरोपी सोफीयाना शेख याने पीडित मुलीचे फोटो
फिर्यादी यांच्या घरच्यांना दाखवून मारुन टाकण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर (Senior PI Suraj Bandgar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, स्थानिक गुन्हे शाखेत कार्य़रत असणाऱ्यावर FIR

लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला चोरीचा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना केला परत