Coronavirus : कोरोना आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे कनेक्शन? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट

नवी दिल्ली : कोरोनाला हरवल्यानंतर सुद्धा काही लोकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. त्यांचे ब्लड प्रेशर सुद्धा वर-खाली होत राहते आणि हृदयाची धडधड वाढते. कारण कोरोनाचा अनेकदा परिणाम थेट हृदयावर सुद्धा होतो, या कारणामुळे सुद्धा पोस्ट कोविडमध्ये हार्ट अटॅक सारख्या घटना दिसून येत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाशी लढाईदरम्यान अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच जर लक्षणे ओळखली तर हार्ट अटॅकची शक्यता खुप कमी होते आणि नंतर रिकव्हरी सुद्धा सोपी होते.

ही लक्षणे ओळखणे आवश्यक
1 श्वास घेण्यास त्रास
2 छातीत वेदना
3 पायांना सूज
4 चालताना धाप लागणे
5 पल्स रेट वेगाने वर-खाली होणे

ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. डॉक्टर सप्तर्षी बासु सांगतात, कोरोनाला हरवल्यानंतर सुद्धा खुप काळजी घ्यावी लागते. डाएटपासून एक्सरसाईज पर्यंत, प्रत्येक बाजूवर जोर देणे आवश्यक आहे. जास्त तळलेले, भाजपलेले, तिखट अन्न सेवन करू नये. सिगारेट आणि दारूपासून दूर रहावे. हलकी ब्रिथिंग एक्सरसाईज सुद्धा करू शकता.

हे लक्षात ठेवा
* भीती, ताण-तणाव, डिप्रेशनपासून दूर रहा
* अगोदरपासून हार्टसंबंधी आजार असेल तर डॉक्टरांशी सतत संपर्कात रहा.