Covid Vaccination | ‘हर घर दस्तक’ ! चक्क उंटावरून बसून आरोग्य कर्मचारी करताहेत लसीकरण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले फोटो शेअर

नवी दिल्ली : वृत्तसंथा – Covid Vaccination | कोरोना वायरस आणि त्याचे नवीन वेरिएंट ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी देशभरातमध्ये लोकांना लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारने गावोगावी लस (Covid Vaccination) पोहोचवण्यासाठी अनेक मोठमोठ्या मोहिमा राबवल्या आहेत. त्यातील एक मोहीम म्हणजे ‘हर घर दस्तक’. ज्यामध्ये गावाकडील लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे.

या मोहिमेअंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये एक महिला आरोग्य कर्मचारी (Health workers) उंटावर बसून राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरमधील गावात लसीकरण (Covid Vaccination) देण्यासाठी जात आहे तर, दुसऱ्या छायाचित्रात तीच आरोग्य कर्मचारी तेथील एका व्यक्तीला लस देताना दिसत आहे.

 

 

याआधी, आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट करून लिहिले आहे कि – नवीन मोहीम पूर्ण केल्याबद्दल देशाचे अभिनंदन. आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या सार्वजनिक सहभागामुळे भारतातील 60 टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. त्याआधी, 5 डिसेंबर रोजी, डिसेंबरच्या सुरुवातीला, आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीतून देशातील 50 टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर 85 टक्के लोकांनी एक डोस पूर्ण केला आहे.

Web Title  : Covid Vaccination | health worker sitting on camel reached barmer vaccine union health minister shared picture

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा