केरळमधील नागरिकांना मिळणार मोफत कोरोना लस; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन : केरळमध्ये सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज केलीय.

केरळमध्ये आज दिवसभरात ५ हजार ९४९ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर, मागील २४ तासांमध्ये ५९ हजार ६९० नमूने तपासले गेले. याशिवाय ५ हजार २६८ जण कोरोनातून बरे झाले आहेत, असे सांगण्यात आले आहे. केरळमधील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आता ६ लाख १ हजार ८६१ इतकी झाली आहे. तर, सध्या ६० हजार २९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

केरळ आता तिसरे राज्य ठरले असून जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती.

यानंतर मध्यप्रदेशकडूनहि ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केलीय. देशात कोरोनावरील लस निर्मितीचे कार्य जोरात सुरूय. जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा मध्यप्रदेशमधील प्रत्येक नागरिकास ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं होतं.

कोरोनावर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आलीय. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

तसेच, ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिलीय. सुरूवातीपासूनच अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, असे दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालीय. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.