Creative Foundation-Ram Mandir | विशेष मुलांनी तयार केलेले राममंदिर हे राम भक्तीचे सर्वोच्च कलश – चंद्रकांत पाटील

‘क्रिएटिव्ह फाउंडेशन’च्या साहाय्याने श्रीराम मंदिराचे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Creative Foundation-Ram Mandir | “अब नार्मल होम” संस्थेच्या विशेष मुलांनी उभारलेली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही ‘कण कण में राम’ची प्रचिती देणारे असून हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे, ह्या प्रतिकृतीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे, मी ह्या विशेष मुलांना अभिवादन करतो असे गौरवोदगार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी काढले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप यांच्या वतीने अब नार्मल होम संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे आज लोकार्पण करण्यात आले त्या कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), ग्लोबल ग्रुप चे संचालक राहुल बग्गा, शिक्षण समिती अध्यक्ष माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushri Khardekar), कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, संस्थेच्या संचालिका किशोरी पाठक, संस्थापक पंकज मिठभाकरे, युवा नेते मंदार बलकवडे,सरचिटणीस दीपक पवार, क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर, सौ. अनुभा वर्तक, जलतरंग वादक मिलिंद तुळणकर तसेच विशेष मुलं व विशेष मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Creative Foundation-Ram Mandir)

व्वा अप्रतिम !! असे उद्गार सहजपणे दादांच्या तोंडून बाहेर पडले आणि मग विशेष मुलांच्या प्रतिभेचे कौतुक करताना संस्थेच्या कार्याला भरभरून मदत करण्याचे वचन ही चंद्रकांतदादांनी दिले. राजकारण करत असताना समाजकारण मौल्यवान असते आणि त्यातून आत्मिक शांती आणि काम केल्याचे समाधान मिळते असे चंद्रकांतदादांनी सांगितले.आज संपूर्ण देश राममय झाला असताना विशेष मुलांनी देखील शिक्षकांच्या साहाय्याने राममंदिर उभारले हे वेगळेपण तर आहेच पण परमेश्वर देखील माणसात कुठे काही कमी दिले तर त्याची भर इतर कला गुण किंवा कौशल्याच्या माध्यमातून करत असतो हेच हे सुंदर मंदिर बघताना जाणवते असे ही ते म्हणाले. (Creative Foundation-Ram Mandir)

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सदस्य वर्षभर सेवा कार्यात व्यग्र असतात आणि दान हे सत्पात्री असावे व ते योग्य ठिकाणी
गरजूपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही काम करतो असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
समाजात दानशूर कमी नाहीत, आपणच त्यांच्या पर्यंत पोहोचण्यात कमी पडतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.ह्या कॅलेंडर वर्षाची सुरुवात विशेष मुलांना मदतीचा हात देऊन करताना मनस्वी आनंद होत आहे असेही खर्डेकर म्हणाले. ग्लोबल ग्रुप सी एस आर आणि इतर माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत असते असे ग्लोबल चे संचालक राहुल बग्गा म्हणाले. ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेथे आम्ही असू असेही त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेच्या संचालिका किशोरी पाठक यांनी संस्थेची माहिती देताना सध्या 45 विद्यार्थी असून आम्ही विशेष विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासावर भर देताना त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.
हे मंदिर तयार करताना शुभम गायकवाड याने विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


हे राममंदिर पुणेकरांना बघण्यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत व शक्य झाल्यास एका मोठ्या गाड्यावर हे मंदिर विविध
चौकात दर्शनासाठी उपलब्ध करू असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच ह्या मंदिरात स्थापित केलेली प्रभू श्रीराम,
सीतामाता व लक्ष्मणाची सुंदर मूर्ती व विद्युत व्यवस्था अत्यन्त प्रेक्षणीय असल्याचेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी अनुदानाच्या अनुकूल अहवालासाठी लाच घेणारे जाळ्यात; सीबीआयची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग, दोन महिलांसह तिघांवर FIR; मुंढवा परिसरातील प्रकार

FIR On BJP MLA Sunil Kamble | सावरणार्‍याच्याच कानशिलात मारली; भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल