Credit Card Market | एचडीएफसी बँकेवरील बॅनमुळे ICICI बँकेचा झाला फायदा, 13.63 टक्के राहिली ग्रोथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Credit Card Market | प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने एचडीएफसी बँकेवर मागील आठ महिन्यांपासून लावलेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरील बॅन (ban on issuing new credit cards) हटवला आहे. आता पुन्हा एकदा क्रेडिट कार्ड मार्केट (Credit Card Market) मध्ये टॉप तीन कंपन्या एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड (SBI Card) आणि आयसीआयसीआय बँकेत स्पर्धा सुरू होणार आहे.

प्रतिस्पर्धी बँकांना अंतर कमी करण्याची संधी
मात्र, बॅनमुळे एचडीएफसी बँकेचे सध्याचे क्रेडिट कार्ड यूजर्स प्रभावित झाले नव्हते, परंतु प्रतिस्पर्धी आयसीआयसीआय बँक आणि एसबीआई कार्डला या सेगमेंटमध्ये एचडीएफसी (HDFC Bank) बँकेसोबतचे अंतर कमी करण्याची संधी मिळाली.

199 बेसिक पॉईंटची भागीदारी गमावली
नोव्हेंबर 2020 मध्ये क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये एचडीएफसी बँकेची भागीदारी 25.6 टक्के होती. बॅननंतर, तिने नोव्हेंबर 2020 आणि जून 2021 च्या दरम्यान 199 बेसिक पॉईंटची बाजार भागीदारी गमावली.

एचडीएफसी बँकेकडे 1.48 कोटी क्रेडिट कार्ड ग्राहक
मात्र, एचडीएफसी बँकेची भागीदारी अजूनही सर्वात जास्त 23.61 टक्के आहे. आरबीआयकडून प्राप्त आकड्यांनुसार, या कालावधीदरम्यान नवीन ग्राहक अधिग्रहणात वाढ -3.63 टक्के राहिली. जून 2021 पर्यंत एचडीएफसी बँकेकडे अजूनही 1.48 कोटी क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत.

 

ICICI बँकेला मिळाला सर्वात जास्त फायदा

एचडीएफसी बँकेच्या नुकसानीमुळे सर्वात मोठा लाभ आयसीआयसीआय बँकेला झाला. ऑक्टोबर 2020 मध्ये क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये आयसीआयसीआय बँकेची भागीदारी 16 टक्के होती जी जून 2021 मध्ये वाढून 17.57 टक्के झाली.

आयसीआयसीआय बँकेने 13.63 टक्केची वाढ नोंदवली. एकुण जून 2021 पर्यंत बँकेचे 1.10 कोटीपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत.

एसबीआय कार्डचे 1.20 कोटी क्रेडिट कार्ड ग्राहक
एक अन्य प्रमुख कंपनी एसबीआय कार्डने 6.63 टक्केची वाढ नोंदवली आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये के्रडिट कार्ड मार्केटमध्ये एसबीआयची भागीदारी 18.79 टक्के होती जी जून जून 2021 मध्ये वाढून 19.17 टक्के झाली.
एसबीआय कार्डचे 1.20 कोटीपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत.

Web Title :- Credit Card Market | icici bank gains at hdfc bank s expense in credit cards amid rbi ban

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cotton Global Market Prices | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जागतिक बाजारात 7 वर्षाच्या उच्चस्तरावर पोहचले कापसाचे दर

Pune Corporation | निवडणुक निधी गोळा करण्यासाठी भाजपने Amenity Space च्या माध्यमातून पुणेकरांची ‘संपत्ती’ विकण्याचा डाव आखला; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Pune Corporation | स्थायी समितीचे ‘वराती मागुन घोडे’ ! प्रशासनाची वर्षभरापासून ‘कार्यवाही’ स्थायी समितीचा निर्णय आता