विराट कोहली ‘या’ ७ वर्षाच्या मुलाचा फॅन, थांबून घेतला ‘ऑटोग्राफ’, अनुष्काही अचंबित (व्हिडीओ)

जमैका : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय कर्णधार विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. परंतु, जसे विराट कोहलीचे जसे इतर लोक चाहते आहेत. तसेच तो ही कोणाचा तरी चाहता आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, कोहली हा एक केवळ ७ वर्षाच्या मुलाचा चाहता असल्याचे नुकतेच एका व्हिडीओ मधून समोर आले आहे.

नुकतंच दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिका संपल्यानंतर विराट आणि अनुष्का बाहेर निघाले होते. त्याचवेळेस विराटची नजर एका ७ वर्षाच्या छोट्या मुलावर पडली. त्याला थांबवत विराटने चक्क त्याची ऑटोग्राफ घेतली. हे पाहून अनुष्का हसली आणि मग काय बाजूचे सर्व खेळाडू हसायला लागले.

https://twitter.com/VeniVidiVici_08/status/116860515923

जेव्हा कोहली ७ वर्षाच्या मुलाचा ऑटोग्राफ घेतो
हा विडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. विराट कोहलीने हा विडिओ ट्विट करत असे म्हटले आहे की, हा माझा ७ वर्षाचा भाचा मॅच बघायला जमैका मध्ये आला होता. तेव्हा मी त्याला इकडे पाहून हैराणच झालो. तो माझ्या जवळ येवून बोलला की, त्याला माझं ऑटोग्राफ घ्यायला आवडेल. हा मजेशीर किस्सा शेअर करत विराटने एका ७ वर्षाच्या मुलाकडून ऑटोग्राफ घेताना शूट केलेला विडिओ ट्विटर वर शेअर केला आहे. विराटला ऑटोग्राफ मिळाल्या नंतर त्याच्या तोंडून ‘वाह्ह शानदार’ असे शब्द बाहेर पडले.

सध्या भारतीय संघाच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यास कारण हि तसेच आहे म्हणा. भारतीय संघाने ३ सामन्यांपैकी २ टी-२० सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. तसेच टेस्ट सिरीज सुद्धा २-० ने आपल्या नवे केली आहे. वर्ल्ड सिरीजचा भाग असणाऱ्या टी-२० मालिका येत १५ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –