IPL मुळं BCCI निशाण्यावर आलं, लोक म्हणाले – ‘चीनी प्रेक्षक शोधल्यास आणखी बरं होईल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलचा १३ वा हंगाम यावर्षी युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होईल. रविवारी झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. बीसीसीआयला भारत सरकारचीही मान्यता मिळाली आहे. पण आयपीएलची बैठक संपल्यानंतरच बीसीसीआयवर टीका सुरू झाली. बॉयकॉट आयपीएल सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

वास्तविक बैठकीत आयपीएलच्या आयोजनासोबतच चिनी कंपन्यांशी कराराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीपूर्वी असे मानले जात होते की, बीसीसीआय आयपीएलची मुख्य प्रायोजक चीनी कंपनी व्हिवोला धक्का देऊ शकते, पण तसे झाले नाही.

बीसीसीआयने चिनी कंपनीबरोबरचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिवो शीर्षक प्रायोजक आहे तर पेटीएम, ड्रीम ११, बायजुज आणि स्विगीमध्ये चिनी गुंतवणूक आहे. भारत आणि चीनमधील सध्याचा तणाव लक्षात घेता, दहा सूत्री अजेंड्यात हा मुद्दा सर्वात महत्वाचा होता.

यातून बीसीसीआयला एका वर्षात ४४० कोटी रुपये मिळतात. बीसीसीआय आणि सौरव गांगुली हे चिनी कंपनीशी संबंध न मोडण्याच्या निर्णयानंतरच ट्रोल होत आहेत.

चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा करत म्हटले की, बीसीसीआय लाज बाळगा. तर एका चाहत्याने म्हटले की, बीसीसीआय आणि आयपीएलने अजूनही या निर्णयाबद्दल विचार केला पाहिजे. एका चाहत्याने लिहिले की, देश प्रथम असतो. बीसीसीआयला फक्त पैसे कमवायचे आहेत. सैनिकांचा सन्मान करा आणि आयपीएलवर बहिष्कार घाला.

चिनी कंपन्यांमुळे भारताला फायदा
लडाखच्या सीमेवर झालेल्या गलवानमध्ये दोन्ही देशांमधील सैनिकी तणावानंतर चीनविरोधी वातावरण तापले आहे. भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसाचारात २० भारतीय सैनिक शहीद झाले. तेव्हापासून चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ म्हणाले होते की, आयपीएलसारख्या भारतीय स्पर्धांच्या चिनी कंपन्यांच्या प्रायोजकतेमुळे देशालाच फायदा होत आहे. बीसीसीआयला व्हिवोकडून वर्षाकाठी ४४० कोटी रुपये मिळतात, त्यासह २०२२ मध्ये पंचवार्षिक करार संपेल.