ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेटर अंबाती रायडूला ‘या’ देशाची ‘खुल्‍लमखुल्‍ला’ ऑफर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत विजय शंकरच्या जागी अंबाती रायडू याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसीआयने मयांक अग्रवाल याच्या नावाचा विचार केल्याने अंबाती रायडू पुन्हा एकदा मागे पडला. वर्ल्डकपसाठी १५ जणांचा संघ निवडल्यानंतर अंबाती रायडू याला स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते, त्यामुळे कोणताही खेळाडू जखमी झाल्यास त्याचा सर्वात आधी विचार केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसायने त्याच्याजागी मयांक अग्रवाल याचा विचार केला.

मात्र आता यानंतर एका देशाने अंबाती रायडू याला नागरिकत्वाची ऑफर दिली आहे. आइसलँड या देशाने त्याला ही ऑफर दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर यासंबंधित ट्विट केले आहे. याचबरोबर नागरिकत्वासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी देखील दिली आहे. मात्र आईसलँडने हे ट्विट किती गंभीरतेने केले आहे याबद्दल शंका आहे. कारण आइसलँड नेहमी आपल्या मजेदार ट्विटसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर पुढे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, अग्रवालच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये तीनच विकेट असल्याने अंबाती रायडूने आता 3D चष्मा उतरवायला हरकत नाही. कारण आम्ही त्याच्यासाठी जी कागदपत्र तयार केली आहेत त्यासाठी सध्या चष्म्याची गरज लागणार आहे. त्यामुळे तू आमच्याकडे ये, तुझ्या सर्वच गोष्टी आम्हाला आवडतात.

दरम्यान, अंबाती रायडूच्या जागी निवड करण्यात आलेल्या विजय शंकरला या स्पर्धेत फार काही उत्तम कामगिरी करण्यात यश आले नाही. चार सामन्यात त्याला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीत देखील काही चमकदार कामगिरी करण्यात यश आले नाही. वर्ल्डकप निवडीवेळी निवड समितीच्या अध्यक्षांनी त्यांना 3D खेळाडू म्हटले होते. मात्र तो त्यांच्या कोणत्याच अपेक्षेवर खरा उतरला नाही.

 

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे