‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात पाकिस्तानचा १००% पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामान होणार आहे. त्या अगोदर सोशल मीडियावर दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडले गेले  आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र याआधीच भारतीय पाठीराखे आणि पाकिस्तानी पाठीराखे यांच्यात सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात युद्ध रंगताना दिसून येत आहे.

आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्या वर्ल्डकप स्पर्धेत सहावेळा सामने झाले आहेत. प्रत्येक सामन्यात भारतानेच बाजी मारली असून पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या सामन्यात देखील भारतच विजयाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. त्याचबरोबर या तीन गोष्टी जर भारताच्या बाजूने घडल्या तर उद्याच्या सामन्यात भारतीय संघाचा विजय निश्चित आहे.

१) धमाकेदार विराट कोहली : भारतीय संघाचा कर्णधार  विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जर उद्याच्या सामन्यात देखील कर्णधार कोहलीचा फॉर्म दिसला तर पाकिस्तानला पराभूत  होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. यावर्षी खेळण्यात आलेल्या १५ सामन्यांत कोहलीने आतापर्यंत ४० पेक्षा जास्त धाव केल्या असून त्यातील ९ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.

२)कुल धोनी स्टाईल : त्याचबरोबर माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने जर फलंदाजी करताना रुद्रावतार धारण केला तर पाकिस्तान या वादळात उडून जाईल,त्यामुळे धोनीसमोर पाकिस्तानचा कोणताही गोलंदाज तग धरू शकणार नाही. धोनीदेखील यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

३)मिडल ओव्हर्समध्ये १५० पेक्षा जास्त धावा फलंदाजी करताना भारतीय संघाने मिडल ओव्हर्समध्ये भारतीय संघाने जर १५० पेक्षा जास्त धावा केल्या तर भारतीय संघाचे सामना जिंकण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांपेक्षा वर जाते. भारतीय संघाची फलंदाजी जगातील सर्वात मजबूत समजली जाते.त्यामुळे उद्या प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी मैदानावर काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्याविषयक वृत्त

पंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

अपघातात पती आणि मुलगा गमावूनही ‘तिने’ दिली अवयवदानास परवानगी

You might also like