भारतीय संघाच्या निवडीवर सौरव गांगुली नाराज ; ‘या’ २ खेळाडूंना द्यायला हवी होती संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषक २०१९नंतर भारतीय संघ ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. रविवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघातील खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. मात्र संघाच्या निवडप्रक्रियेवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रश्न उपस्थित केला आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार संघात युवा खेळाडू शुभमन गिल आणि अजिंक्य राहणे यांचा एक दिवसीय संघात समावेश करायला हवा होता. त्याने त्याचे हे मत ट्वीटवरुन निवड प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

संघ निवड ही सर्वांना खूश करण्यासाठी नाही तर देशासाठी सर्वोत्कृष्ट संघ निवडणे आणि नेहमी चांगली कामगिरीसाठी असते. भारतीय संघ हा बलाढ्य संघ आहे. बलाढ्य संघाकडे सतत खेळणारे खेळाडू असतात. भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारात खेळू शकतात. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कायम राखण्यासाठी त्यांना तीनही संघामध्ये घ्यायला हवं होते, असं गांगुलीने म्हटलं आहे. तसंच एकदिवसीय संघात गिल आणि रहाणे हे दोन खेळाडू नसल्यान आश्चर्य वाटलं. या खेळाडूंना तीनही प्रकारात संधी द्यावी, असंही त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघावर अनेकांनी टीका केल्या. तसंच वेस्ट इंडीज ए विरुद्ध इंडिया ए संघातून खेळताना सर्वाधिक २१८ धावा केल्या होत्या. त्यामुळे गिल फॉर्ममध्ये असूनही त्याला संघात न घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच या निवड प्रक्रियेवर गिलनेही नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/SGanguly99/status/1153835618314543104

https://twitter.com/SGanguly99/status/1153836129478561793

आरोग्यविषयक वृत्त –