ICC World Cup 2019 : मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय संघासाठी विजय ‘अवघड’ ; ‘या’ कारणांमुळे करावी लागणार ‘मेहनत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत वर्ल्डकप स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा सामना चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडबरोबर होणार आहे. मँचेस्टरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याआधी भारतीय संघासाठी या मैदानावरील प्रवास फार अवघड आहे. या स्पर्धेत भारताने या मैदानावर दोन सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला होता. वेस्टइंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात या मैदानावर भारतीय संघाने विजय मिळवला असून न्यूझीलंडने देखील या मैदानावर विंडीजवर विजय मिळवला आहे.

एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात जरी भारतीय संघाने न्यूझीलंडपेक्षा जास्त सामने जिंकले असले तरी वर्ल्डकपमध्ये मात्र न्यूझीलंड भारताच्या पुढे आहे. वर्ल्डकप मधील आतापर्यंत झालेल्या सात सामन्यात न्यूझीलंडने चार सामन्यांत विजय मिळवला असून यामुळे भारतीय संघाचे सेमीफायनलमधील आव्हान अवघड आहे. स्पर्धेआधी झालेल्या सराव सामन्यात भारताची मजबूत फलंदाजी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर कोसळली होती. तसेच त्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तो आत्मविश्वास न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये असणार आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला असून फिरकी गोलंदाजांना केवळ १२९ विकेट घेता आल्या आहेत. त्याचबरोबर मँचेस्टरच्या मैदानावर देखील वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला असणार. भारतीय गोलंदाजांनी देखील या मैदानावर उत्तम कामगिरी केली असून २० पैकी १५ विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत.

आमने – सामने

जर एकूण सामन्यांचा विचार केला तर या बाबतीत भारतीय संघाचे पारडे जाड असून १०६ सामन्यांपैकी ५५ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला असून न्यूझीलंड संघाने ४५ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ५ सामने रद्द झाले आहेत. त्याचबरोबर २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ८ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे.

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर