माझ्यासह १०० खेळाडूंना ‘तात्काळ’ काश्मीर सोडण्यास सांगितलंय : क्रिकेटर इरफान पठाण

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्राही रद्द करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्य़टकांना देखील काश्मीरमधून आपापल्या राज्यात परत जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याच्यासह १०० अधिक खेळाडूंना काश्मीर सोडण्यास सांगितले आहे.

इरफान पठाण आणि त्याच्यासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर लोक तिथून परतणार आहेत तर काश्मीरमधील लोकांनी तिथेच थांबावे असे आदेश सरकाने दिले आहेत. याबाबत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी म्हणाले, कँपमध्ये असलेल्या जवळपास १०२ खेळाडूंना परत पाठवलं आहे. या ठिकाणची परिस्थिती तणावपूर्ण असून काय चाललंय हे समजू शकत नाही. या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या स्पर्धा पुन्हा घेण्यात येतील.

१७ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होणार आहे. रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २०१९-२० च्या घरेलू सर्व प्रकारात एकूण २ हजार ३६ सामने होणार आहेत. त्यापैकी काही सामने जम्मू काश्मीरमध्ये होणार होते.

आरोग्यविषयक वृत्त