Cricket Match Fixing Case | क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- क्रिकेटविश्वातून (Cricket) एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचे प्रकरण (Cricket Match Fixing Case) उघडकीस आले आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंना मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्यामुळे शिक्षा भोगावी लागली आहे. यामध्ये आता संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) एका खेळाडूचा समावेश झाला आहे. या प्रकरणात (Cricket Match Fixing Case) त्याला 14 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं करिअर संपल्यात जमा झालं आहे.

मेहरदीप छावकर (Mehrdeep Chowkar) असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. 2019 मध्ये त्याच्यावर आरोप लावले होते. परंतु त्याने त्या आरोपाचं खंडन देखील केलं होतं. पण तो दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या पूर्वी, मेहरदीप छावकरशी संबंधित प्रकरणात आयसीसीनं (ICC) यूएईच्या (UAE) दोन क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी घातली होती.

सुरुवातीला छावकरनं आपल्यावरील मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
मात्र, खराब कामगिरीसाठी खेळाडूला हेतुपुरस्सर प्रभावित केल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये आणि अ‍ॅन्टी करप्शन कोडसंबंधी (Anti Corruption Code) दोन गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला.
एवढंच नाही तर मॅच फिक्सिंगच्या आरोपांच्या तपासात सहकार्य न केल्याबद्दलही तो दोषी आढळला.
त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर हि कठोर कारवाई केली आहे.

Web Title :- Cricket Match Fixing Case | match fixing in cricket again this player banned for 14 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा