Pune Crime | महापालिका परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे कॉपी करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) विविध जागांच्या भरतीसाठी सध्या लेखी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी ज्युनिअर क्लार्क टायपिस्ट (Junior Clerk Typists) परीक्षेत मोबाईल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा (Electronic Devices) वापर करुन कॉपी करणार्‍या एका तरुणाला रंगेहाथ (Pune Crime) पकडण्यात आले.

 

पवन उत्तम मारक Pawan Uttam Marak (वय २५, रा. औरंगाबाद) असे अटक (Arrest) केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. त्याचा साथीदार अनिल भारती Anil Bharti (रा. जालना) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी तुषार नामदेव बोरावके Tushar Namdev Borawke (वय ३१, रा. नर्‍हे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३५/२२) दिली आहे. हा प्रकार एनडीए (NDA) मधील इंडियन इंन्स्टुमेंट फॉर एरोनॉटीकल इंजिनिअरींग अँड आयटी शास्त्री कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ज्युनिअर क्लार्क, टायपिस्ट पदाची बुधवारी लेखी परीक्षा होती.
यातील एनडीएमधील केंद्रावर पवन मारक हा परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुन
त्याद्वारे बाहेर असलेला मित्र अनिल भारती यांला संगणकावरील फोटो पाठवत होता.
अनिल भारती हा त्याची उत्तरे पवन याला पाठवून कॉपी करत असताना त्याला पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक शेख (Police Inspector Shaikh) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Copying by electronic device in municipal exam arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | ‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे, त्याच्यावर बोलून …’ नितेश राणेंचा प्रहार

Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना

All India Marathi Film Corporation Election | मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाऊन हरकत घ्या, निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा