जनतेच्या सेवेसाठी सैनिकाच्या रूपात महेंद्रसिंह धोनी ‘सज्ज’ : लष्करप्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच लेफ्टनंट कर्नलच्या रूपात टेरिटोरिअल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत जॉईन होणार आहे. धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत व्हिक्टर दलासोबत काश्मीरमध्ये सेवा बजावेल. धोनीला गार्ड , पेट्रोलिंग आणि पोस्ट ड्युटीचे काम सोपवले आहे. याच दरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याविषयी लष्कर प्रमुख जनरल बीपीन रावत म्हणाले की, धोनीच्या सुरक्षेची काही गरज नाही तो तर जनतेची सेवा करेल.

जनरल रावत म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी सेनेसोबत काम करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कोणत्याही इतर सैनिकाप्रमाणे धोनी सैनिकाची भूमिका निभावेल. जनतेच्या सेवेसाठी सैनिकाच्या रूपात महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे.

त्यांनी म्हटले की, जेव्हा एक भारतीय नागरिक सेनेची वर्दी घालतो तेव्हा त्याला वर्दीशी संबंधित सर्व कामे करायला तयार रहावे लागते. धोनीने मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो त्याचे काम पूर्ण करेल. धोनीने आपल्या युनिटसोबत काम करण्यासाठी क्रिकेटमधून दोन महिन्याची सुट्टी घेतली आहे. धोनी २०१५ मध्ये आग्रा ट्रेनींग कँपमध्ये विमानातून पॅराशूटमधून उडी घेऊन क्‍वालिफाइड पॅराशूटर बनला होता.

आरोग्यविषयक वृत्त