ICC World Cup 2019 : महेंद्र सिंह धोनीच्या ‘चक्‍कर’मध्ये भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न ‘भंगणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना भारताची दमछाक झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत २२४ धावा केल्या. त्यानंतर बुमराह आणि शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने ११ धावांनी मिळवला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवली.

मात्र त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानसारख्या तुलनेने दुबळ्या संघाबरोबर विजय मिळवताना भारतीय संघाला झगडावे लागले. त्यामुळे स्पर्धेत पुढे होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर धोनीने ५२ चेंडूत फक्त २८ धावा केल्या.

वरची फळी चालली नाही तर..

अफगाणिस्तान आगोदर झालेल्या पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात वरच्या फळीतील एकतरी फलंदाज शेवटपर्यंत टिकत असल्याने भारतीय संघाला या सामन्यांत मधल्या फळीची गरज पडली नाही. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध भारताची हि बाजू कमकुवत असल्याचे उघड झाले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. त्याचबरोबर केदार जाधव याने अर्धशतकी खेळी केली परंतु त्याने देखील यासाठी खूप चेंडू घेतले. त्यामुळे धोनीचा फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.

स्ट्राईक रोटेशन मोठी समस्या

महेंद्रसिंग धोनी हा वेगवान गोलंदाजांची चांगली खेळत असला तर फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याला स्ट्राईक रोटेट करता येत नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या धावगतीवर परिणाम होऊन त्याचा फरक धावसंख्येत दिसून येत आहे. मागीलवर्षी देखील धोनी अशाच संकटात सापडला होता. मात्र या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत आपण रंगात आल्याचे दाखवून दिले होते. मात्र आता पुन्हा त्याच्या या खेळीने भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधूक वडजवळी आहे.

दरम्यान, धोनी सध्या फलंदाजीत कमी पडत असला तरी त्याला बेस्ट फिनिशर म्हणूनही ओळखलं जातं. तसेच त्याच्या यष्टीरक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा संघाला वेळोवेळी होत आहे. तो फलंदाजीत थोडा कमी पडत असला तरी कर्णधार कोहलीला उत्तम मार्गदर्शन करत असल्याने धोनीची फार मोठी मदत होत आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

गॅस, अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी करा ‘ही’ एक्सरसाइज ; मिळेल आराम

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम