भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडच्या ‘वनडे-कसोटी’ मालिकेतून ‘हिटमॅन’ रोहित ‘OUT’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडच्या दौऱ्यावर 5-0 असा टी-20 मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार भारतीय सलामीवीर रोहित शर्माला पुढील न्यूझीलंड दौऱ्याला मुकू शकतो. पाचव्या टी – 20 सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सामन्यात फील्डिंग करु शकला नाही. आता रोहित शर्मा न्यूझीलंडच्या विरुद्धच्या वनडे आणि कसोटीतून बाहेर होऊ शकतो. न्यूझीलंडच्या विरोधात वनडे सीरीजची सुरुवात 5 फेब्रुवारीला हॅमिल्टनमध्ये होईल. तर 2 कसोटी सामन्यांची सीरीज 21 फेब्रुवारीला खेळली जाईल.

रोहित शर्माला दुखापत –
न्यूझीलंडच्या 5 व्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक केल्यानंतर त्याचा पाय दुखू लागला. परंतु असे असताना त्याने मैदान सोडले नाही. 17 व्या षटकाला रोहित शर्मांने ईश सोधीच्या चेंडूवर षटकार मारला ज्यानंतर त्याचे दुखणे आणखी वाढले. त्यानंतर त्याने मैदान सोडले.

रोहित शर्माचे सामन्यातून बाहेर होणे भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. रोहित मागील वर्षांपासून फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडच्या विरोधात टी – 20 सीरीजमध्ये त्याने दोन सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. टी – 20 सीरीजमध्ये त्यांनी 4 सामने खेळले आणि 46.66 सरासरीने 140 धावा केल्या. हॅमिल्टन टी 20 मध्ये रोहित शर्माने 65 धावा केल्या होत्या. ज्यात त्याने सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार लगावत भारतीय संघाला विजयी केले. त्यानंतर 5 व्या सामन्यात त्याने 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

रोहित शर्माने मागील एका वर्षात 23 वनडे सामन्यात 59.50 च्या सरासरीने 1309 धावा केल्या. ज्यात त्याने 7 शतक आणि 4 अर्धशतक केले. कसोटी सामन्यांचा विचार केला तर रोहितने मागील 5 कसोटी सामन्यात 92.66 च्या सरासरीने 556 धावा जमावल्या. ज्यात त्याने 3 शतक मारले. त्यामुळे रोहित शर्मांचे सामन्यातून बाहेर होणे भारतीय संघासाठी धक्का आहे.

पृथ्वी शॉ आणि राहुल करणार ओपनिंग –
रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय संघ आपल्या सलामीवीरांची जोडी बदलणार हे निश्चित आहे. त्यामुळे वनडे सीरीजमध्ये केएल राहुल आणि पृथ्वी शॉ मैदानात पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर उतरु शकतात. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच विराट कोहलीने स्पष्ट केले की केएल राहुन वनडे सीरीजमध्ये मध्यक्रमांवर उतरेल, परंतु आता राहूल सलामीवीर म्हणून उतरु शकतो.

वनडे सीरीजसाठी भारतीय संघ –
विराट कोहली, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, ऋषभ पंत, केएल राहुल, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर

वनडे सीरीजचा कार्यक्रम –
टी – 20 सामन्यात इतिहास रचल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडच्या विरोधात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मैदान उतरेल. पहिला सामना 5 फेब्रुवारीला हॅमिल्टनमध्ये होईल. दुसरा सामना 8 फेब्रुवारीला. तिसरा सामना 11 फेब्रुवारीला. त्यानंतर कसोटी सामन्यात देखील दोन्ही संघ समोरासमोर असतील. कसोटी मालिकेचा पहिला सामना 21 फेब्रुवारीला तर दुसरा सामना 29 फेब्रुवारीला होईल.