रणजी ट्रॉफी खेळण्याची किंमत शून्य आहे का ? या भारतीय खेळाडूचा निवड समितीवर ‘घणाघात’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्थानिक क्रिकेटमध्ये तसेच रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर खेळाडूला भारतीय संघात प्रवेश करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर भारतीय अ संघात खेळण्याची संधी मिळते. मात्र जर खेळाडूंना चांगली कामगिरी करून देखील संघात स्थान मिळत नसेल तर खेळाडू आपल्या भावना अनेकवेळा सार्वजनिकरित्या देखील व्यक्त करतात. त्याचप्रमाणे आता सौराष्ट्राचा खेळाडू शेल्डन जॅक्सन यानेदेखील आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत.

त्याने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले कि, सौराष्ट्राच्या खेळाडूंना दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. यावर्षी देखील रणजीमध्ये सौराष्ट्राचा संघ अंतिम सामना खेळला होता. मात्र सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून देखील एकाही खेळाडूला भारताच्या अ संघात देखील स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे रणजी सामन्यात खेळून काय उपयोग ? त्याचा शून्य फायदा आहे का ? त्याचबरोबर पुढे त्याने म्हटले कि, तीन वेळा अंतिम सामन्यात खेळून देखील एकदाही आमच्या संघाचे कौतुक करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही रणजी सामने खेळून काय उपयोग ? मी निवड समितीवर प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र चांगली कामगिरी करून देखील आमची संघात निवड होत नसेल तर आमच्यात काय कमी हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे निवड समितीने पारदर्शक पद्धतीने काम करावे, असा सल्ला देखील त्याने दिला.

दरम्यान, शेल्डन जॅक्सन याच्या या ट्विटवर निवड समिती सदस्य तसेच बीसीसीआयकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –