क्रिकेटर ‘जोफ्रा आर्चर’नं 6 वर्षांपूर्वी ट्विटमध्ये केला होता रियाचा ‘उल्लेख’, जुनं ट्विट झालं व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्डकप दरम्यान गोलंदाज जोफ्रा आर्चर त्याच्या ट्विट संदर्भात मोठ्या चर्चेत आला होता. संपूर्ण टूर्नामेंट दरम्यान त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले होते. वर्ल्डकप नंतर देखील त्याचे अनेक ट्विट चर्चेत होते. जोफ्रा आर्चरच्या एका जुन्या ट्विटमध्ये रिया नावाचा उल्लेख आहे ते पाहून भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. चाहत्यांनी त्याचं हे ट्विट शेयर करत आर्चरला भगवान आणि टाइम मशीन अशा उपमा दिल्या आहेत.

सहा वर्षांपूर्वी आर्चरने केलं होतं ‘रिया’ वर ट्विट

भारतात सध्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. या प्रकरणात रिया चक्रावर्तीवर अनेक आरोप लावले जात आहेत. आर्चरने 16 जुलै 2014 ला एक ट्विट केलं होतं, “Rhea and Tesaale” टेसलचा अर्थ, पडदा किंवा तशा प्रकारच्या वस्तूला एक गाठ बांधण्यासाठी वापरण्यात येणारा रेशमी गुच्छा, साध्या भाषेत सांगायचं झालं तर ‘लटकन’. सुशांतने देखील लटकूनच आत्महत्या केली. चाहत्यांनी हे ट्विट पाहून आर्चरला ही गोष्ट 6 वर्षांपूर्वीच माहित होती असं म्हणायला सुरुवात केली आहे. काही चाहते म्हणाले आर्चरकडे टाइम मशीन आहे त्यामुळं त्याला सगळं समजतं.

काही चाहते म्हणाले की आर्चरचे सगळे ट्विट वाचले पाहिजे कदाचित त्याने कोरोना कधी संपणार यासंदर्भातही काहीतरी ट्विट केलं असेल. काहींनी तर आर्चरला प्रश्न केला की, कोहली कधी बाप बनणार आहे.

इंग्लंडचा टॉप गोलंदाज आहे जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चरला त्याच्या खतरनाक बाउंसर साठी ओळखले जाते. त्याच्या याच कौशल्याने त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना नाकी नऊ आणलं होतं. पण मागील काही दिवसांत आर्चरच्या बाउंसरची धार कमी झालेली दिसून येते. जोफ्रा आर्चरला सध्या आरामाची गरज आहे. आर्चरने त्याच्या डेब्यु नंतर इंग्लंडसाठी सर्वात जास्त बॉल टाकले आहेत.