श्रीलंकेचा स्टार बॉलर लसिथ मलिंगा ‘या’मुळे वर्ल्डकप सोडून मायदेशी परतणार

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन  सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. विजेतेपदाची दावेदार असलेले संघ एकीकडे जबरदस्त कामगिरी करत असताना  काही संघ मात्र सुमार प्रदर्शनामुळे चिंतेत आहेत. श्रीलंका देखील त्याच देशांपैकी एक. या स्पर्धेत श्रीलंकेने आतापर्यंत  ४ सामने खेळले असून त्यात फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला असून त्यांचे दोन सामने पाऊसामुळे वाया गेले असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

एकीकडे सुमार कामगिरीची चिंता आहे तर आता प्रमुख वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा मायदेशी जाणार असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. लसिथ मलिंगा हा आज श्रीलंकेला रवाना होणार आहे. त्याच्या सासूचे निधन झाल्याने तो काही कालावधीसाठी मायदेशी रवाना होणार आहे. मात्र १५ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल अशी माहिती देण्यात आली आहे.मलिंगाने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले असून त्याने यात  तीन बळी  मिळवले आहेत. याआधी झालेला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात 

 

You might also like