Video : ‘हा तर सन्मानच’ ! महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्‍त ICC ने शेअर केला व्हिडीओ

लंडन : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीचा उद्या ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ICC ने एक व्हिडीओ शेअर करून धोनीचा गौरव केला आहे. ICC ने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे नाव, जगभरातील लक्षावधी लोकांना प्रेरणा देणारे नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी होय. अशा शब्दांत ICC ने महेंद्रसिंग धोनीचा गौरव केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत धोनीच्या बेस्ट फिनिशर खेळीतील क्षण दाखवण्यात आले आहेत. धोनीचा वाढदिवस ७ जुलैला असून त्यानिमित्ताने आयसीसीनं हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. या वर्ल्डकपनंतर धोनी निवृत्त होईल अशी देखील चर्चा सुरु आहे.

काय आहे व्हिडिओत ?
आयसीसीनं शेअर केलेल्या व्हिडिओत इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी धोनीविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराट म्हणतो की, धोनी भारत आणि त्याच्यासाठी खास आहे. त्याच्यासोबत फलंदाजी चांगला अनुभव होता. मी जेव्हा संघात आलो तेव्हा धोनी कर्णधार होता आणि तो नेहमीच राहील. धोनीनं प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी उभा राहिला.

विराट म्हणाला की, धोनीकडून खूप काही शिकलो तो नेहमीच माझा कर्णधार असेल. विराटशिवाय जसप्रीत बुमराहनेसुद्धा धोनीबद्दल सांगितले आहे. बुमराह म्हणाला, मी २०१६ ला पदार्पण केलं तेव्हा धोनी कर्णधार होता. गोलंदाजी करताना धोनी कशी मदत करतो ते बुमराहने सांगितले.

 

आरोग्यविषयक वृत्त

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी