माजी क्रिकेटपटू सतीश टकले यांचे दु:खद निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

क्रिकेट रसिकांसाठी दु:खद घटना वेगवान गोलंदाज आणि उंच फटके मारणारे फलंदाज माजी क्रिकेटपटू सतीश टकले यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते विदर्भ रणजी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

मधुमेहाने पीडित असलेले टकले हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.दरम्यान तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने अखेरचा श्र्वास घ्यावा लागला. ते ६० वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्रुषा आणि मोठा आप्तपरिवार आहे.सतीश टकले यांनी १९८० ते १९९० च्या दरम्यान ३० प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. माजी क्रिकेटपटू अशोक भागवत यांचे ते आवडते शिष्य असुन तेअनेक क्रिकेटपटूंचे कोच सुध्दा होते. क्रिकेटसोबतच उत्तम गायक व शास्त्रीय संगीताची आवड त्यांना होती.रामदासपेठ यूथ स्पोर्टिंग क्लब आणि नागपूर क्रिकेट अकादमी या क्लबच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.तसेच व्हीसीएच्या निवड समितीवरही ते होते. असे वेगवान गोलंदाज व धडाकेबाज फलंदाज सतीश टकले यांनी अखेरचा निरोप देऊन चाहत्यांना धक्का दिला.