पुलवामा हल्ल्यावर कपिल देवने प्रतिक्रिया देणे टाळले

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लात भारतीय लष्कराचे ४० जवान शहीद झाले. देशात या जवानांच्या जाण्याने शोकाकुल वातावरण असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणे सुद्धा महत्वाचे समजले नाही.

नवी मुंबईत मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या कपिल देवला पत्रकारांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या बद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्याचे उत्तर न देता कपिल देव निघून गेला. भारतीय संघाचे माजी कर्णधार म्हणून कपिल देव यांना भारतभर सन्मान दिला जातो मात्र त्यांनी देशावर झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया देणे देखील पसंत केले नाही . त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

कपिल देव यांच्या वागण्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे कपिल देव अशा पध्द्तीने वागत असताना दुसरीकडे वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे शहीद जवानांच्या कुटुंबांची मदत करण्यासाठी सरसावले आहेत. कपिल देव यांच्या या वागण्यावर सर्वच स्तरातून नाराजीचा सूर उमठत आहे.